औसा शहराला निम्न तेरणा प्रकल्प, माकणी धरणातून पाणीपुरवठा व्हावी अशी शहरवासीयांची 25 वर्षांपासूनची मागणी होती. आ अभिमन्यू पवार यांनी औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा करणारी 49 कोटी रुपयांची योजना मंजूर करून आणली. नियमित आढावा घेत योजनेचे काम प्रत्यक्षात पूर्ण करवून घेतले आणि औसेकरांचे माकणीच्या पाण्याचे स्वप्न पूर्ण केले. औसा शहराला माकणी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित झाली असून या योजनेमुळेच 2024 च्या दुष्काळाच्या झळांची तीव्रता औसेकरांसाठी थोडीशी कमी झाली.
भविष्यातील औसा शहराचे होणारे विस्तारीकरण लक्षात घेऊन शहरातील वाढीव वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून 43 कोटी रुपयांच्या औसा शहर वाढीव वस्ती पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्यात असून योजनेचे काम लवकरच प्रत्यक्षात सुरु होणार आहे.
किल्लारी व आजीबाजूच्या 30 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या किल्लारी व 30 खेडी पाणीपुरवठा योजनेची भूकंपानंतर आखणी करण्यात आली होती. 2007-08 च्या दरम्यान ही योजना बंद पडली. अभिमन्यू पवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून किल्लारी व 30 खेडी योजना पुनर्जीवित करण्यासाठी 29 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. या निधीतून महावितरणचे सुमारे 4 कोटींचे वीजबिल अदा करण्यासह एचडीपीईची पाइपलाइन, जलशुद्धीकरण प्रकल्प इ. कामे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आ अभिमन्यू पवार यांनी वीजबिलावरील 6.50 कोटींचे थकीत व्याज व दंड माफ करून आणले आणि 15-17 वर्ष बंद असलेली किल्लारी व 30 खेडी पाणीपुरवठा योजना 22 जुलै 2023 रोजी पुन्हा कार्यान्वित झाली.
अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खरोसा व 6 खेडी आणि मातोळा व 10 खेडी या दोन्ही बंद योजना पुनर्जीवित करण्यासाठी अभिमन्यू पवार यांनी निधी मंजूर करून आणला. दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाले असून वीजबिलाचा विषय मार्गी लागून दोन्ही योजना पुन्हा कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत.
निलंगा तालुक्यातील कासार सिरसी या मोठ्या गावासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी जलजीवन मिशन अंतर्गत बडूर लघु तलावातून पाणीपुरवठा करणारी 10.29 कोटी रुपयांची स्वतंत्र कासार सिरसी पाणीपुरवठा योजना मंजूर करवून आणली. सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर करवून आणलेल्या या योजनेचे काम अंतिम टप्यात असून लवकरच कासार सिरसीकरांना बडूर लघु तलावातून पाणीपुरवठा सुरु होणार आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2. 0 योजनेअंतर्गत लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 550 कोटी रुपयांच्या लातूर महानगरपालिका पाणीपुरवठा योजनेची व 910 कोटी रुपयांच्या लातूर शहर मलनिःस्सारण प्रकल्पाची आखणी करून आमदार अभिमन्यू पवार यांनी सरकारदरबारी जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2. 0 योजनेअंतर्गत 14 डिसेंबर 2023 रोजी पहिल्या टप्यात लातूर शहर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी २६० कोटी रु. व मलनिःस्सारण प्रकल्पासाठी ३०५ कोटी रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्याचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे आणि उर्वरित निधी मंजूर व्हावा यासाठी आ अभिमन्यू पवार प्रयत्नशील आहेत.