पुरस्कार

  • homeपुरस्कार

आमदार अभिमन्यू पवार यांनी शेत तिथे रस्ता व मनरेगातून ग्रामसमृद्धी सारख्या कल्पक अभियानांच्या माध्यमातून केलेल्या शेतकरी हिताच्या कामांची तसेच विविध योजनांच्या माध्यमातून औसा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची दखल घेऊन "एशिया वन" या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मॅगझिनने त्यांना "भारतीय महानतम विकास पुरस्कार - २०२४" हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना शेतरस्ता उपलब्ध करून देत शेतरस्त्यांचा औसा पॅटर्न तयार केल्याबद्दल नवभारत या नावाजलेल्या वृत्तसंस्थेने आमदार अभिमन्यू पवार यांना "नवभारत ॲचिव्हर्स अवार्ड - 2024" या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ९ मार्च, २०२३ रोजी दुबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात दुबई राज परिवाराचे प्रमुख सन्माननीय शेख मोहम्मद जी यांच्या वरिष्ठ सल्लागार डॉ अर्शी आयुब यांच्या हस्ते आ अभिमन्यू पवार यांनी नवभारत ॲचिव्हर्स अवार्ड स्वीकारला. यावेळी नवभारतचे कार्यकारी संचालक श्री वैभवजी माहेश्वरी व्यासपीठावर उपस्थित होते.
हा पुरस्कार मी औसेकर मतदार बंधू भगिनींना समर्पित करतो, त्यांच्या आशीर्वादामुळेच हा सन्मान मला मिळू शकला आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी रस्ता, पाणी व वीज या शेतीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी केलेल्या नियोजनबद्ध कामांची तसेच ग्रामविकासासाठी आणि समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या वतीने त्यांना स्व. यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काल पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास आमदार साहेबांनी उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारला.

आमदार अभिमन्यू पवार यांनी शेत तिथे रस्ता अभियानांतर्गत मतदारसंघात निर्माण केलेले शेतरस्त्यांचे जाळे, मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर केलेली फळबाग लागवड व शेतकरी बांधवांना जनावरांसाठी बांधून दिलेले गोठे आदी कामांची दखल घेऊन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने त्यांना सेवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.